लोणी काळभोर, (पुणे) : विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
राहुल रोहिदास जाधव (वय-३१ रा. भगवा झेंडा चौक, स.नं. १२ लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडुन पोलिसांनी कडुन ३ पिस्टल व ३ काडतुस असा एकूण ९१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट ६ चे पथकातील अधिकारी व अंमलदार पुणे परिसरात गस्त घालीत होते. यावेळी एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली कि, गुंजन टॉकीज समोरील हिंदु स्मशानभुमि, येरवडा, पुणे येथे एक इसम पिस्टल घेऊन विक्रीसाठी थांबलेला आहे. त्याने अंगात निळे रेघांचा फुलबाहीचा शर्ट, व निळया रंगाची जिन्स घातलेली आहे.
मिळालेली माहिती वरिष्ठांना सांगून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्या ताब्यातून १ पिस्टल व १ काडतुस असा ३० हजार ४०० रुपयांचे बेकायदेशिर रित्या वापरलेले पिस्टल जप्त करण्यात आले.
तपासात आरोपीने बेकायदेशिर विक्रीसाठी घरात लपवुन ठेवलेली आणखी २ पिस्टल व २ काडतुस असा ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. असा एकूण ९१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-६, हे करीत आहेत.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश मानेपोलीस उप-निरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, नितिन धाडगे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे व चालक पो.ना. सुहास तांबेकर यांनी केली आहे.