लहू चव्हाण
पाचगणी : पांचगणी येथील टेबल लॅंन्ड रोडवर मारहाण करून चोरी करणाऱ्या आरोपीस महाबळेश्वर न्यायालयाने १ वर्ष करावस व १० हजार रुपयांची शिक्षा ठोठावली आहे.
नितीन रमेश फणसे (वय-४० रा. सिद्धार्थनगर पाचगणी) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पाचगणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांचगणी येथील टेबल लॅंन्ड रस्त्यावर २३ नोव्हेंबर २०२२ला सकाळच्या वेळी प्रमोद शंकर शेलार ( पाचगणी ) याला आरोपी नितीन फणसे याने मारहाण करून त्याचेकडील रोख रक्कम जबरीने चोरून नेली.याबाबत पाचगणी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पाचगणी पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली होती.
पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर , उप विभागीय पोलीस अधिकारी वाई शितल जानवे- खराडे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माने यशवंत महामुलकर, फौजदार अनिल बाबर, कुंभार यांनी गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून महाबळेश्वर न्यायालयात आरोपी नितीन रमेश फणसे विरुद्ध दोषारोप पाठवला होता. त्यानंतर सदर गुन्ह्याचा खटला महाबळेश्वर न्यायालयात चालू होता.
दरम्यान, सदर गुन्ह्यात आरोपी नितीन फणसे हा दोषी आढळल्याने महाबळेश्वर न्यायालयाने एक वर्ष कठोर कारावास व दहा हजार रुपये दंड व दंड भरल्यास तीन महिने कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.