पुणे : पीएमपीच्या पास केंद्रातून १० हजार ७०० रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली.
याबाबत व्यंकटी धनगरे (वय ४२ रा. लोणी काळभोर) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना २१ डिसेंबरला संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास विश्रांतवाडीतील विमानगर रस्त्यावरील कार्यालयात घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यंकटी हे पीएमपीएलमध्ये विश्रांतवाडी परिसरातील पास केंद्रात नियुक्तीला आहेत.
२१ डिसेंबरला संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ते पास केंद्राला कुलूप लावून प्रसाधनगृहात गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी पास केंद्राचा दरवाजा वाकवून १० हजार ७०० रूपयांची रोकड चोरून नेली. व्यंकटी हे माघारी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण तपास करीत आहेत.