यवत (दौंड) : ऊस तोडणी कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्याची घटना राहू (ता. दौंड) येथील बाळोबा मंदिराच्या परिसरात सोमवारी (ता.२६) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एका ४ वर्षाच्या चिमुकल्याच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर १० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांना घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो चालकाला वळणाचा अंदाज न येऊन टेम्पो पलटी झाला. जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला ससून येथे पुढील उपचारासाठी पाठवले आहे. तर हा टेम्पो पिंपळगाव येथील एक गु-हाळ चालकाचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
दरम्यान, या अपघातात ४ वर्षाच्या चिमुरड्याच्या मृत्यु झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.