पुणे : गुरु माऊली आण्णासाहेब मोरे यांच्या महासत्संग सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ६५ हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना मोशी (ता. हवेली) येथील पीआईसीसी ग्राऊंडवर शनिवारी (ता.११) घडली आहे.
याप्रकऱणी एका महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या मोशी येथे आयोजीत गुरु माऊली आण्णासाहेब मोरे यांच्या महासत्संगाला गेल्या होत्या. यावेळी खूप मोठी गर्दी जमा झाली होती. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांचे फॅन्सी मंगळसुत्र व १ लाख ३० हजार रुपयांचे मोठे मंगळसुत्र असा एकूण सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.
दरम्यान, याप्रकऱणी महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.