सागर जगदाळे
भिगवण (इंदापूर) : बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या टोळीने एका महिलेच्या गळ्यातील तब्बल २ लाखाचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची धक्कादायक घटना इंदापूर (जि. पुणे) शहरातील बसस्थानकावर नुकतीच घडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. २ लाखाचे सोन्याचे गंठण चोरल्यामुळे चोरट्यांची दिवाळी झाली आहे. हे मात्र खर आहे. तर सदर चोरीच्या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
याप्रकरणी शारदा गोपाळ कांबळे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दोन महिला चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा कांबळे या बसमध्ये चढत होत्या. तेव्हा गर्दीचा फायदा घेत महिलांच्या टोळीने शारदा यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरी केले. हा सर्व प्रकार बस स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सदर चोरी करणाऱ्या महिलांनी तोंडाला स्कार्फ बांधले होते. शारदा कांबळे यांच्या गळ्यातील गंठण काढून घेतले आणि आपल्या टोळीतील दुसऱ्या महिलेकडे दिले. यानंतर या दोघीही तेथून निघून गेल्या. ह्या महिलांच्या टोळीवर तातडीने कारवाई करावी. अशी मागणी नागरिक करीत आहेत.
याप्रकरणी शारदा कांबळे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दोन महिला चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.