लातूर : दरोडा म्हटलं की, आपल्या मनात चोरी, खून अन् मारामारी असे चित्र उभे राहते. मात्र जगातील सर्वात सुंदर रोबरी लातुरात झाली आहे. दरोडेखोरांनी घरात घुसून दोन चिमुकल्यांची पप्पी घेऊन दीड किलो सोन्यासह २ कोटी रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील कातपूर रोडवरील कन्हैयानगर येथे घडली आहे.
याप्रकरणी राजेश अग्रवाल यांनी लातूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश अग्रवाल यांच्या घरात पहाटे तीनच्या सुमारास पाच दरोडेखोर घुसले, त्यांनी आकाश अग्रवाल आणि कुटुंबीयांना पिस्टल कोयता चाकूचा धाक दाखविला. मात्र कोणालाही इजा केली नाही, उलट दोन लेकरांची पप्पी घेतली आणि घाबरु नका. असे सांगितले.
राजेश अग्रवाल यांच्या गळ्यातील लॉकेट देवाचे आहे. असे पत्नीने सांगितल्यानंतर दरोडेखोर म्हणाले ताई घाबरु नका. म्हणून त्यांनी ते लॉकेट सोडून दिले. आणि घरातील इतर सोन्याचे दीड किलो दागिने आणि तब्बल दोन कोटी रुपय रोख रक्कम लंपास केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली, पोलिसांनी दरोडेखोरांच्या शोधासाठी चारही दिशांना पोलिस पथके रवाना केली आहेत. तरी पुढील तपास पोलीस करीत आहेत.