( Suspended ) पुणे : पुणे पोलीस (Pune Police) दलातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला तडकाफडकी निलंबीत करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पुणे पोलीस दलात एलच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीकडून या उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयाची लाच घेतली होती.
शहर पोलीस दलात खळबळ…!
अरविंद शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अरविंद शिंदे हे अलंकार पोलीस ठाण्यात कार्यरत असून ते डहाणूकर पोलीस चौकीत अधिकारी म्हणून काम करतात.
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे यांनी गुरुवारी (दि.9) कामात कसुरी केल्याचा ठपका ठेवत शिंदे यांना निलंबित केले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
अधिक माहिती अशी की, घराच्या मालकी हक्कावरुन अलंकार पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील आरोपीला मेसेज करुन पोलीस चौकीत बोलावून घेत 50 हजार रुपये घेतल्याचे आढळून आले.
तसेच दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे गुन्ह्याचा तपास असताना दाखल गुनह्यातील आरोपींना अटक करण्याची भिती घालून अरविंद शिंदे यांनी पैसे घेतले. शिंदे यांनी अधिकाराचा गैरवापर करुन पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
पोलीस स्टेशनमध्येच लाच घेणार्या उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन ; थेट व्हिडीओच दिला पोलीस अधीक्षकांना
चंदननगरचे पोलीस निरीक्षक कदम निलंबित; कर्त्यव्यात कसुरीचे प्रकरण :