दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर येथील एका तरुण पोलीस पाटीलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गागरगाव येथे शनिवारी (ता.१९) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. यामुळे इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
विकी ज्ञानदेव लोंढे (वय ३२, रा.लोंढेवस्ती, गागरगाव, ता.इंदापूर) असे आत्महत्या केलेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील ज्ञानदेव भगवान लोंढे ( रा. लोंढेवस्ती, गागरगाव,ता.इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकी लोंढे यांनी गागरगाव परिसरातील वनविभागाच्या हद्दीतील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र विकासने नेमकी आत्महत्या का केली. याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्या दृष्टीने इंदापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.