Suicide | नांदेड : नांदेड जिल्ह्यातून हादरवणारी घटना समोर आली आहे. एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या तरुणाने हे टोकाचे पाऊल आयुष्यात आलेल्या अपयशातून उचलले असल्याचे समोर आली आहे. आत्महत्येपुर्वी त्याने सुसाईड नोट लिहली आहे.
त्यामध्ये या तरुणाने जे लिहले ते वाचून सर्वांना धक्काच बसला आहे. .मी कोणत्या मुलीसाठी नाही तर माझ्या अनसक्सेस लाईफ ला कंटाळून टोकाचं पाऊल हे पाऊल उचलले असल्याचे नोटमध्ये लिहले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रशांत ढवळे (वय 23) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाने नाव आहे.
प्रशांत हा कुटुंबियासोबत लोहा शहरातील इंदिरा नगर मध्ये राहत होता. बीएससी नंतर डीएमएलटीचे शिक्षण घेतलेला प्रशांत एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत होता. शिवाय स्पर्धा परिक्षा व पोलीस भरतीची तयारी तो करत होता. मात्र यामध्ये त्याला अपयश आल्याने तो नैराश्यात गेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री प्रशांत आपल्या रूम मध्ये गेला. आतून त्याने कोंडी लावली त्यानंतर लोखंडी रॉडला दोरी बांधून त्याने गळफास घेतला. सकाळी उशीरा पर्यंत दरवाजा बंद असल्याने कुटुंबियांने दरवाजा ठोठावला. मात्र काही प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्या नंतर प्रशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
प्रशांतची सुसाईट नोट…
अण्णा आणि आई माफ करा मला, मी कायमच तुम्हाला सोडून जायचा निर्णय घेतला आहे. हे टोकाचं पाऊल कोणत्या मुलीसाठी किंवा तिच्या प्रेमासाठी उचलत नाही. मी कोणत्या ही मुलीवर प्रेम करत नाही. एवढा मोठा निर्णय घेण्याचं कारण एकच आहे की, मी माझ्या अनसक्सेस लाईफ ला कंटाळलो आहे. मला जगण्याचं कोणतच कारण समोर दिसत नाही. माझ्या समोर कोणतेच ध्येय उरले नाही तसेच कुठल्या ही प्रकारची मेहनत घेण्याची इच्छा नाही. अण्णा इथून पुढे तरी आईला त्रास देऊ नका. हीच माझी आखरी इच्छा समजा.
घटनेची माहिती मिळताच लोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.