Suicide | मंगळुरू : कर्नाटकातील मंगळुरू येथील एका लॉजमध्ये दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत आढळले. आर्थिक तंगीतून ही आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन जुळ्या मुलींचाही समावेश आहे. हे सर्व म्हैसूरचे रहिवासी आहेत. हॉटेलच्या खोलीतून एक चिठ्ठीही मिळाली आहे.
देवेंद्र (४८), त्यांची पत्नी निर्मला (४६) आणि त्यांच्या नऊ वर्षांच्या जुळ्या मुली चैत्रा आणि चैतन्य अशी मृतांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. देवेंद्रने आपल्या मुलांना अन्नातून विष देऊन ठार केले आणि आत्महत्येपूर्वी पत्नीचा गळा दाबून खून केला, अशी शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. हॉटेलमधल्या बुकिंगची मुदत शुक्रवारी संपल्यानंतरही कुटुंब खोलीबाहेर न आल्याने हा प्रकार उघड झाला.
यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्याने स्पेअर चावीने खोलीचा दरवाजा उघडला आणि हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हॉटेलला भेट दिली. या कुटुंबाने 27 मार्च रोजी लॉजमध्ये भाड्याने खोली घेतली होती आणि ती 30 मार्च रोजी रिकामी करायची होती.
आर्थिक तंगीतून आत्महत्या केल्याची शक्यता…
खोलीतून एक चिठ्ठीही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्यामध्ये आर्थिक कारणास्तव हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Sucide News : पत्नीसह तिच्या 3 मित्रांच्या त्रासाला कंटाळून पतीने केली आत्महत्या ; एकास अटक
Sucide : पुण्यात हुंडा न दिल्यावरून नवविवाहितेचा छळ; महिलेची राहत्या घरात आत्महत्या..!
Suicide | महिलांनी मारहाण केल्याने खाणीत उडी मारुन रिक्षाचालकाची आत्महत्या : धानोरीतील घटना