पुणे : शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी द्राव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील मुंढावा भागात घडली होती. मात्र, यात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंजिनीअर तरुणाने आपल्या शिक्षणासोबत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले सुरुवातीला त्याला भरपूर नफा झाला. मात्र, बाजारात सातत्याने मंदी येत गेल्याने तो निराशेत गेला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले, आणि आई-वडील, बहिणीसह स्वतःच्याही जेवणात विष कालवून संपूर्ण कुटुंबच संपवले.
दिपक थोटे (वय- ५९), इंदू दिपक थोटे (वय- ४५) मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (वय- २४) मुलगी समीक्षा दिपक थोटे (वय- १७) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत.
मिळालेल्या महिती नुसार, जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील रविदास नगर येथील रहिवाशी दीपक थोटे यांच्या कुटुंबाची स्थिती अतिशय गरीबीची होती. त्यांच्याकडे कुठलीही शेती नव्हती. त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षण दर्यापूर या ठिकाणी पूर्ण केले. दोन महिन्यांपूर्वी थोटे कुंटूब केशवनगर परिसरात भाड्याने रहायला आले होते त्याचा मुलगा ऋषिकेश थोटे इंजीनिअर होता. आणि एक मुलगी ही शिक्षण घेत होती.
मुलगा ऋषिकेश थोटे हा इंजिनीअर झाल्यानंतर त्याने शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला. त्यामध्ये त्याला आधी नफा मिळत गेला. मात्र, शेअर मार्केटमध्ये मंदी आल्याने ऋषिकेश थोटे हा पूर्णतः हवालदिन झाला होता. लोकांपासून लाखो रुपये घेतल्याने पैसा आता कसा परत करावा? या चिंतेत ऋषिकेश होता. त्यानंतर त्याने टोकाचे उचलले. आपल्या आणि आई-वडील, लहान बहिणीच्या जेवणात विष कालवून दिले. या घटनेत थोटे कुटुंबातील चारही सदस्यांचा धक्कादायक मृत्यू झाला. त्याने जेवणात विष कालवलंसदरच्या घटनेची माहिती दर्यापूर येथे कळली.