पुणे : Sucide News पत्नी आणि तित्या 3 मित्रांना मानसिक त्रास दिल्याने पतीने आत्महत्या (Sucide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना येरवडा परिसरातील महाराष्ट्र हौसिंग बोर्डमध्ये घडली आहे. (Sucide)
येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कुणाल संभाजी शिंदे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कुणाल यांची आई पुष्पा संभाजी शिंदे (72, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, एल 35, रूम नं. 404) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरवडा पोलिस ठाण्यात चौघांविरूध्द आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार, त्यांची पत्नी रिता कुणाल शिंदे, तिचे मित्र रितीक राज, स्वप्निल गजरे आणि सचिन चांदणे यांच्याविरूध्द येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2005 पासुन आजपर्यंत रिता कुणाले शिंदे हिने तिच्या 3 मित्रांच्या मदतीने पती कुणाल शिंदे यास मानसिक त्रास दिला असे तक्रारीत नमूद केले आहे. या चौघांनी मिळुन कुणाल शिंदे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने कुणाल यांनी आत्महत्या केली. दरम्यान, येरवडा पोलिसांनी स्वप्निल गजरे याला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.