पुणे : अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग उपायुक्त यांच्या वतीने आकाशचिन्ह विभागाला कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार काल (दि. २०) सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये बांधकाम विभाग व आकाशचिन्ह विभागाने सुमारे ३ हजार चौरस फुटांचे फ्रंट व साईड मार्जिन बांधकाम काढून टाकण्यात आले. तसेच आकाशचिन्ह विभागाने १४ नामफलक काढून टाकले.
ही कारवाई परिमंडळ तीनचे उपायुक्त जयंत भोसेकर यांच्या नियंत्रणाखाली या कारवाईचे नियोजन करण्यात आले होते. या कारवाईमध्ये वारजे व सिंहगड क्षेत्रीय कार्यलयाचे अभियंता सुनील यादव, कनिष्ठ अभियंता शिंदे, आकाशचिन्ह निरीक्षक युवराज वाघ व अजित जोगळेकर, अतिक्रमण निरीक्षक सोनार यांच्यासह सुमारे ५० कर्मचारी सहभागी झाले होते.