पुणे : पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघोलीमध्ये एका देशी दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या दुकानात चार जणांची तुफान हाणामारी झाली आहे. दारूच्या दुकानात बसलेल्या चार व्यक्ती एकमेकांना भिडले असून दारूच्या बाटल्याही फोडल्या आहेत.
नेमक काय घडल?
व्हायरल सीसीटीव्हीमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती देशी दारूच्या दुकानात प्रवेश करतो. दुकानात काही व्यक्ती बसलेले असतात त्या ठिकाणी जातो. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. शाब्दिक चकमक सुरु असताना ही व्यक्ती मारहाण करण्यास सुरुवात करतो. त्यानंतर टेबलवर बसलेले तिघेजण या व्यक्तीच्या अंगावर धावून येतात. त्यां चौघामध्ये तुफान राडा सुरू होतो.
त्यानंतर हे तिघेही या एका व्यक्तीला मारहाण करतात. मात्र ते तिघे असताना सुद्धा हा एकटा व्यक्ती त्यांना मारहाण करताना दिसत आहे. पुन्हा पुन्हा त्यांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहे. एवढंच नाही तर दारूच्या रिकाम्या बाटल्याचं क्रेट उचलून तिघांच्या अंगावर फेकतो. खूप वेळ या चौघांचा राडा सुरु होता.
View this post on Instagram
दरम्यान, हा हाणामारीच्या काळात या दुकानात अनेक लोक येतात जातात. मात्र कुणीही या भांडणात पडताना दिसत नाही. भांडण सोडवण्याची हिंमत कोणीही करताना दिसत नाही. थोड्या वेळानंतर हे सर्वजण शांत होतात. मात्र, या प्रकारची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. या राड्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.