कोल्हापूर : कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कोवाड स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचं एटीएम चोरट्यांनी फोडलं आहे. चोस्ट्याने एटीएम फोडून तब्बल 18 लाख 77 हजार 300 रुपयांची रोकड पळवली आहे. एटीएमधून लाखोंची रोकड लंपास केल्यानंतर चोरट्याच्या भरधाव चारचाकीने पोलिसांनी आडवे लावलेले बौरेगेट तोडुन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी थरारक पाठलाग केला. या पाठलागादरम्यान पोलीस आणि चोरट्यांच्या वाहनांना एकमेकांना जोराची धडक बसली. या धडकेनंतर चोरटे कार सोडून पैसे घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदगडच्या कोवाडमध्ये एटीएममधील लाखो रुपये लंपास करणारे चोरटे राजस्थानचे असल्याची प्राथमिक महितीतून उघड झाले आहे. यामुळे कोल्हापूर पोलिसांचे क्राईम ब्रँच पथक चोरट्यांच्या शोधासाठी रवाना झालं आहे. या चोरीच्या घटनेनेमुळे परिसरात एकच भीती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे चंदगडमधील नागरिकाकडून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चोरटे राजस्थानमधील असल्याचा संशय…
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोवाड येथे दरोड्याची घटना घडली आहे. कोवाडमधील एसबीआयच्या एटीएमवर दरोडा घालण्यात आला. त्यानतर चोरट्यांनी मध्यरात्री 18 लाख रुपयांची रोकड दरोडेखोरानी पळवली. या घटनेनंतर चोरटे राजस्थानमधील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चोरीची घटना घडल्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. त्यानंतर दरोडेखोरांच्या शोधासाठी चंदगड पोलिसांची पथके रवाना झाल्याची माहिती हाती आली आहे.