अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : नातेपुते : लहानपणापासून बकऱ्यांमागे काठी घेऊन धावणारी बारामतीची रेश्मा शिवाजी पुणेकर हिची केवळ जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर भारतीय बेसबॉल महिला संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. याबद्दल श्रीगोंदा अग्निपंख फाउंडेशनच्या सदस्यांनी खास सायकल प्रवास करून, रेश्माला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे बेस्ट खेळाडूचे सन्मानपत्र देऊन आई-वडिलांसह सन्मानित केले.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे सन्मानपत्र देऊन केला सन्मान
बारामती तालुक्याच्या पश्चिम जिराईत भागातील तरडोली (तुकाईनगर) येथे राहणाऱ्या रेश्माने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भारतीय बेसबॉल संघाच्या कर्णधारपदाची मान पटकवला. (Sports News) आज ती कर्णधारपदाची धुरा तेवढ्याच समर्थपणे सांभाळत आहे. याबद्दल रेश्मा पुणेकर हिचा गौरव श्रीगोंदा अग्निपंख फाउंडेशनच्या सदस्यांनी केला.
बारामतीचे पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे, उद्योजक राम कुतवळ, वृद्धेश्वर मल्टीस्टेटचे अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे यांनी धनादेश व डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाचे बेस्ट खेळाडूचे सन्मानपत्र देऊन रेश्माला आई-वडिलांसह गैरवले. या वेळी प्राध्यापक संतोष तांबे यांचाही सन्मान करण्यात आला. बारामतीचे पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे यांनी या फाउंडेशनबद्दल गौरवोद् गार काढले. तसेच आगामी काळात कॅनडा येथे होणाऱ्या बेसबॉल खेळासाठी शुभेच्छा दिल्या.
बारामतीच्या रेश्माचा कर्णधारपदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अतिशय संघर्षमय आहे. रेश्माने आजपर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामने, चीन आणि हाँगकाँग या देशात खेळले आहेत. आतापर्यंत तर एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २३ राष्ट्रीय सामन्यात तिने महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केलेले आहे. (Sports News) २८ राज्यस्तरीय सामने तसेच ०४ गोल्ड मेडल, ०६ रजत पदक, ०३ कास्य पदक आणि महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्राप्त केलेला आहे. ती हाँगकाँग, चिनसारख्या आगळ्यावेगळ्या देशात जाऊन दोन वेळा एशियन स्पर्धा खेळून आलेली आहे. हाँगकाँगसारख्या देशात झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला एशियन कप २०२३ या स्पर्धेत कर्णधार म्हणून देखील रेश्माने नेतृत्व केले आहे.
जिज्ञासा, श्रम करण्याची जिद्द आणि आई-वडिल व गुरुजनांचे प्रेम, या सर्व बाबींमुळे आपण यथोचित शिखर गाठू शकतो याचे उत्तम उदाहरण रेश्मा पुणेकर यांनी समाजामध्ये अनेक खेळाडूंना घालून दिले आहे. या वेळी माजी सरपंच नवनाथ जगदाळे, कवी हनुमंत चांदगुडे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राजेंद्र साळुंखे, लक्ष्मण सातवे, प्राध्यापक संतोष तांबे यांनी गौरवपूर्ण मनोगत व्यक्त केले. (Sports News) शरद मचाले यांनी सूत्रसंचालन केले. तर दत्ताजी जगताप यांनी आभार मानले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : टीम इंडियाला मोठा दिलासा; क्रिकेटपटू श्रेयस अय्यर तंदुरुस्त, आता…
Sports News : 2036 मध्ये भारत ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणार; क्रीडामंत्र्यांनी आखली योजना..
Sports News : विक्रमी खेळी करत रवींद्र जडेजाने कपिल देवसह अनिल कुंबळे यांना टाकले मागे