नवी दिल्ली : चीन येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी 22 सदस्यीय भारतीय फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय फुटबॉल संघाची माजी कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर बाला देवीने भारतीय महिला फुटबॉल संघात पुनरागमन केले आहे. बाला देवीने चार वर्षांनंतर संघात पुनरागमन केले आहे.
2019 मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ती खेळली होती. देशासाठी 46 सामन्यांत 26 गोल केले आहेत. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत विक्रमी 634 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने 634 भारतीय खेळाडूंना मान्यता दिली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबरपासून चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत. 2018 साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 572 भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
भारतीय महिला संघात यांना मिळाली संधी
बाला देवी, अस्तम ओराव, ज्योती, मनीषा, रेणू, रितू राणी, संजू, संगीता बसफोर, इलांगबम चानू, दालिमा छिब्बर, ग्रेस डांगमेई, सौम्या गुगुलोथ, श्रेया हुडा, इंदुमती कथिरेसन, आशालता देवी, प्रियांका देवी, एन. देवी, आर संध्या, रंजना चानू, अंजू तमांग, जक्सा.