पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडिलांनी गर्लफ्रेंडबद्दल अपशब्द वापरला म्हणून पोटच्या मुलाने व पत्नीने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना दिघी येथे रविवारी (दि.5) रात्री उशीरा घडली आहे.
अशोक रामदास जाधव (वय 45) असे खून करण्यात आलेल्या वडिलांचे नाव असून राहूल अशोक जाधव (वय 25), अनिल अशोक जाधव (वय 23) यांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी अनिल याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्या मुलीबद्दल मयत अशोक यांनी अपशब्द वापरले होते. याचाच राग मनात ठेवत दोन मुलांनी घरातील दोरीने गळा आवळून अशोक यांचा खून केला. यावेळी फरशीवर पडलेले रक्ताचे डाग पुसत आईने पुरावा नष्ट कऱण्याचा प्रयत्न केला. तर अशोक याने मृतदेह घरातील फॅनला अडकवून आत्महत्या केल्याचा दिखावा केला. पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.