पुणे : धनकवडी येथील राहत्या घरातून बाहेर पडलेल्या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी नीरा नदीपात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
नेहा शरद पिलाणे (वय २०, रा. जयनाथ चौक, धनकवडी, मूळ – वांगणी ता. वेल्हे) असं या तरुणीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा पिलाणे ही १२ जानेवारी रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडली होती. बरेच तास उलटून गेल्यानंतर नेहा परतली नसल्याने घरातील लोक चिंताग्रस्त झाले. नेहा कुठे कामाला व किंवा शिक्षण घेत नसून ती घरातच असायची. त्यामुळे बराच वेळ उलटून गेल्याने तिच्या आईने आणि कुटुंबातील इतर लोकांनी तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन बंद लागत असल्याने तिच्या मित्र, मैत्रिणींनाही विचारणा केली. परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
नेहा ही बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नीरा नदीपत्रात एक मृतदेह अढळला. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
पोलिसांनी चौकशी केली असता सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक तरुणी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तपासणी केली असता सदर मृतदेह हा बेपत्ता असलेल्या नेहाचाच असल्याचं उघड झाले.
दरम्यान, नेहा पिलाणे हिने घराबाहेर पडल्यानंतर कात्रजवरून शिरवळकडे जाण्यासाठी बसची दोन तिकिटे काढल्याचे पोलीस तपास उघड स्पष्ट झाले आहे. मात्र नेहाने स्वत:चं जीवन संपवले की तिची हत्या करण्यात आली, याबाबत अस्पष्टता असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.