पुणे : एका तरुणील लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यात घडली आहे. या आरोपाखाली एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी अतुल वामनराव कुतवळ याला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार व ॲट्रॉसिटी कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीचे पोलिस होण्याचे स्वप्न असून ती पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होती. आरोपी अतुल ही पोलीस भरतीची तयारी करत होता. याच दरम्यान दोघांची ओळख झाली. अतुलने युवतीला लग्नाचे आमिष दाखविले व तिच्या मनाविरूध्द शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा तरुणीने अतुलला लग्न करण्याबाबत विचारणा केली तेव्हा त्याने तरुणी मागासवर्गीय समाजाची असल्याकारणाने लग्न करण्यास असमर्थता दर्शवली. त्याानंतर तरुणीने दौंड पोलिस ठाण्यात धाव घेत त्याच्या विरोधात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस करत आहेत.