Shocking News : नगर : वहीवाटीचा बंद केलेला रस्ता खुला करण्याचे आदेश देणार्या तहसीदारांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता. ३०) दुपारी घडली आहे. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी तिघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तिघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
याप्रकरणी तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी करणसिंह घुले, सत्यजित घुले (दोघे रा. नेवासा खुर्द), ज्ञानेश्वर वसंत घुले (रा. दहिगावने, शेवगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा पार्क, साईतेज कॉलनी, फाटके कॉम्लेक्स, शांती नगर अशा पाच कॉलनी नगर-संभाजीनगर महामार्गालगत आहेत. मुकुंदपूर गट नंबर 80/3/अ मध्ये एन.ए मंजूर आहे. हा गट नंबर करण घुले यांच्या मालकीचा आहे. (Shocking News) घुले यांनी त्यामधून जाणारा रस्ता बंद केला म्हणून त्या विरोधात कॉलनीतील शेकडो नागरिकांनी रस्तारोको आंदोलन केले. पोलिस पथकासह तहसीलदार हे कर्मचार्यांसह घटनास्थळी पोहचले.
मुकिंदपूरचे सरपंच सतीश दादा निपुंगे तेथे होते. आंदोलकांची समस्या समजावून घेत तहसीलदार बिरादार यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यास गेले. (Shocking News) आंदोलकही त्यांच्यासोबत होते. तलाठी अण्णा दिघे यांनी रस्ताकेस संदर्भात पंचनामा सुरू केला.
या दरम्यान घुले बंधू तेथे आले. ले आऊट रस्ता खुला होईपर्यंत बंद केलेला रस्ता तातडीची गरज असल्याचे समोर आल्याने तो खुला करण्याचे तोंडी आदेश तहसीलदार बिरादार यांनी दिले. ‘ही जागा आमच्या मालकीची आहे. त्यातून रस्ता द्यायचा नाही, कसे, काय रस्ता देता, ते बघतोच, असे म्हणून तिघे घुले बंधू तहसीलदारांच्या अंगावर धावून आले. त्यांनी धक्काबुक्की केली.
दरम्यान, करणसिंह व सत्यजित घुले यांनी जीवे मारण्याच्या हेतूने तहसीलदार बिरादार यांचा गळा दाबून त्यांना खाली पाडले. तहसील कर्मचारी व पोलिसांनी बिरादार यांची त्यांच्या तावडीतून सुटका केली. तहसीलदार संजय बिरादार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी करणसिंह, सत्यजित व ज्ञानेश्वर घुले या तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तलाठी व कोतवाल संघटनेचे गुरुवारपासून ‘काम बंद’ आंदोलन..
आजपर्यंत वाळू तस्करांकडून तहसीलदारांवर हल्ला झाल्याचे अनेकदा घडले. मात्र वहिवाटीच्या रस्त्यावरून तहसीलदार संजय बिरादार यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेचा निषेध करत आरोपींना अटक करावी यासाठी गुरुवारी (दि. 31)पासून (Shocking News) नेवासा तहसील कार्यालयातील कर्मचारी, कामगार तलाठी, कोतवाल बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन करणार असल्याची माहिती तलाठी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सोपान गायकवाड, जिल्हा संघटक अनिल गव्हाणे, तालुकाध्यक्ष बद्रीनाथ कमांदर यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shocking News : धक्कादायक! वाळू माफियांनी पोलिसाला ट्रॅक्टरखाली चिरडलं; पोलिसाचा जागीच मृत्यू