Shocking News Pune : पुणे : पुणे शहरातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. एकाच कुटूंबातील तीन जणांची आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. तिघांनीही विषारी औषध घेतले आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य् दोघांना उपचासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. हडपसर जवळील फुरसुंगी हद्दीतील भोसले व्हिलेजमधील लक्ष्मी निवासमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Suicide attempt of three of the same family in Fursungi!)
फुरसुंगी येथील भोसले व्हिलेजमधील घटना
सुर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (70, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी, हडपसर) यांचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे (वय 60)आणि मुलगा चेतन सूर्यप्रकाश अबनावे (वय 41) विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांची नाव आहे. यांना शहरातील ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Shocking News Pune) या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हडपसर पोलीसांनी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील फुरसुंगी येथे अबनावे कुटूंब लक्ष्मी निवासमध्ये रहावयास आहे. आज (सोमवार) त्यांनी राहत्या घराचा दरवाजा आतून बंद करून विषारी औषध घेतले होते. त्यामध्ये सूर्यप्रकाश अबनावे यांचा मृत्यू झाला आहे. इतर दोघांना उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Shocking News Pune) यांनी
विषारी औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न नेमका कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप समोर आले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पाण्यात तोंड धुण्यासाठी गेला अन् क्षणात दिसेनासा झाला; खडकवासला कालव्यात मुलगा बुडाला
Pune Crime : सिनेस्टाईल पाठलाग करत वाहन चोरट्यांना अटक; वानवडी पोलीसांची कामगिरी