Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईत धक्कादायक घटना!सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाने 12व्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 August 2026, 11:56

पुणे : मुंबईतील ताडदेव परिसरात एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार्तिक असे या मृत तरुणाचे नाव असून, तो जयपूरचा मूळ रहिवासी होता. त्याचे वडील राजस्थान सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक मुंबईत व्यवस्थापन शाखेचे (मॅनेजमेंट) शिक्षण घेत होता. अभ्यासासाठी तो ताडदेव परिसरातील ‘आदित्याची हाईट्स’ या इमारतीमध्ये राहत होता. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याने या इमारतीच्या 12 व्या मजल्यावरील ‘रेफ्युजी एरिया’मध्ये जाऊन अचानक खाली उडी घेतली.

उंचावरून खाली पडल्याचा प्रचंड आवाज झाल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्या दिशेने धाव घेतली. मात्र, थेट 12 व्या मजल्यावरून पडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन कार्तिकचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.या घटनेची माहिती मिळताच ताडदेव पोलीस ठाण्याचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवला आहे.

एका तरुण विद्यार्थ्याने अचानक इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मानसिक तणाव किंवा अन्य कोणत्या कारणास्तव ही घटना घडली आहे का, या सर्व बाबींचा ताडदेव पोलीस सखोल तपास करत आहेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

काटेवाडीत जातिवाचक शिवीगाळ करत कोयत्याने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 16:32

वाघोलीत गांजा सेवन करणाऱ्या चौघांवर कारवाई ; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

Saturday, 24 October 2026, 16:07

महामार्गावर अतिक्रमणांचा विळखा, प्रशासनाचे दुर्लक्ष! लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाट टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त

Saturday, 24 October 2026, 15:55

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिसावर जीवघेणा हल्ला! डोकं फुटेपर्यंत बेदम मारहाण; रकक्षच असुरक्षित?

Saturday, 24 October 2026, 15:41

पुणे–बंगळुरू प्रवासाचा वेळ वाचणार! वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसची तारीख समोर; तब्बल 3 तासांची बचत..

Saturday, 24 October 2026, 15:23

पुणे–लोणावळा लोकल प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या रेल्वे ब्लॉक; लोकल फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळापत्रकातही बदल

Saturday, 24 October 2026, 14:44
Next Post

लोणी काळभोरमध्ये आदेश असूनही अतिक्रमण हटविण्याची कारवाई रखडली, महसूलचे पथक जागेवर, मात्र पीएमआरडीएचे अधिकारी गायब; ‘मिलीभगत’चा जमीनमालक महिलेचा गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp