Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भरवस्तीत अचानक जमिनीखालून आला मोठ्ठा आवाज! वाहनांच्या काचा फुटल्या अन् घाबरून नागरिकांची धावपळ; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 23 November 2026, 20:38

पुणे : आंबेगाव बुद्रुक परिसरातील सिंहगड कॉलेज रस्त्यावर रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. शिवसृष्टी परिसरात दुपारी दोनच्या सुमारास अचानक जमिनीतून मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच सुमारे ५० फूट उंचीपर्यंत पाण्याचे फवारे उडू लागले. सुरुवातीला नेमके काय घडले, हे नागरिकांच्या लक्षात आले नाही. मात्र, महापालिकेची १,४०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याचे समोर आले. या घटनेत लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. पाण्याच्या जोरासोबत उडालेल्या दगडांमुळे काही वाहनांच्या काचा फुटल्या, तर परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली.

रविवारी दुपारी दोन वाजता सिंहगड कॉलेज रस्त्यावरील शिवसृष्टी परिसरात अचानक जमिनीतून मोठा आवाज झाला. त्यानंतर जलवाहिनीतून प्रचंड वेगाने पाणी बाहेर पडू लागले. पाण्यासोबत उडणाऱ्या दगडांचा फटका रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि जवळच्या दुकानदारांना बसला. रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारसह काही वाहनांच्या काचा फुटल्या. तसेच परिसरातील काही साहित्याचेही नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. अवघ्या सहा मिनिटांत, म्हणजे दुपारी २ वाजून ६ मिनिटांनी पंपिंग बंद करण्यात आले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून गेले होते.

वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून महंमदवाडीला पाणीपुरवठा करणारी सुमारे २३ किलोमीटर लांबीची ही मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटल्याने समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या जलवाहिनीवर सुमारे तीन हजार वेल्डिंगचे जोड असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, जलवाहिनीची हायड्रॉलिक चाचणी करण्यात आली असतानाही गळती झाल्याने तपासणी प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सुमारे चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या महंमदवाडीतील समान पाणीपुरवठा योजनेच्या टाक्यांना याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जलवाहिनी फुटल्याचा परिणाम महंमदवाडी, एनआयबीएम आणि राजस सोसायटी परिसरातील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे.

याबाबत पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख आणि मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. सोमवारी दुपारनंतर संबंधित भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या भागातील अरुंद रस्ता, भूमिगत वाहिन्या, विद्युत केबल, वाहतुकीची वर्दळ आणि सखल भागात पाण्याचा अधिक दाब यामुळे दुरुस्तीच्या कामात अडचणी येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केली जात असताना आंबेगाव बुद्रुक परिसरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठ्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहनांच्या काचा फुटल्या आणि साहित्याचे नुकसान झाल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले. या घटनेमुळे जलवाहिनीच्या कामाची गुणवत्ता आणि देखभाल याबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात भरवस्तीत अचानक जमिनीखालून आला मोठ्ठा आवाज! वाहनांच्या काचा फुटल्या अन् घाबरून नागरिकांची धावपळ; नेमकं काय घडलं?

Monday, 23 November 2026, 20:38

कुणबी प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडीटीच्या अडचणींवरून जरांगे पाटील आक्रमक! चार ते पाच टप्प्यांत प्रत्येक जिल्ह्याचा दौरा; सरकारचं टेन्शन वाढणार?

Monday, 23 November 2026, 19:05

कुंजीरवाडीतून रुग्णवाहिका चालक एक महिन्यापासून बेपत्ता

Monday, 23 November 2026, 18:58

गोड बोलून ज्येष्ठ महिलेच्या घरात घुसली तरुणी; आधी योजनेची माहिती दिली नंतर मालिशच्या बहाण्याने बेडरूममध्ये घुसून….

Monday, 23 November 2026, 18:51

पुणे हादरलं! विप्रोतल्या IT इंजिनिअर तरुणीचा मृत्यू; इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या बॉयफ्रेंडला अटक

Monday, 23 November 2026, 17:40

साडेसतरानळीत ओढ्याच्या पात्रातील बिल्डरची अतिक्रमण जमीनदोस्त करा! अमोल तुपे यांची मागणी

Monday, 23 November 2026, 17:11
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp