Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गोड बोलून ज्येष्ठ महिलेच्या घरात घुसली तरुणी; आधी योजनेची माहिती दिली नंतर मालिशच्या बहाण्याने बेडरूममध्ये घुसून….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 23 November 2026, 18:51

पुणे : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून तिला घरात प्रवेश देणे किती धोकादायक ठरू शकते, याची जाणीव करून देणारी घटना पुण्यातील लष्कर परिसरात घडली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची माहिती देण्याच्या बहाण्याने एका तरुण महिलेने ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर मानेची मालिश करून देण्याच्या बहाण्याने महिलेच्या उशीखाली ठेवलेली सोन्याची माळ चोरून नेली. न्यू मोदी खाना येथील गोल हौद परिसरात हा प्रकार घडला.

या प्रकरणी ७५ वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ३० ते ३५ वर्षे वयोगटातील एका महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला न्यू मोदी खाना येथील गोल हौद परिसरात एकट्याच राहतात. त्यांचा मुलगा वानवडी परिसरात राहतो. संबंधित ज्येष्ठ महिलेला गंभीर आजार असून, नुकतेच त्यांच्यावर ऑपरेशन झाले आहे. शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्या घरात एकट्याच असताना ३० ते ३५ वर्षे वयोगटातील एक महिला त्यांच्या दारात आली.

सुरुवातीला तिने ‘लाडकी बहीण’ योजनेची माहिती देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेशी संवाद साधला. त्यानंतर मानेची मालिश केल्यास आराम मिळेल, असे सांगत तिने मालिश करण्याची तयारी दर्शवली. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठ महिलेने तिला घरात प्रवेश दिला.

घरात आल्यानंतर आरोपी महिलेने ज्येष्ठ महिलेची मालिश करण्यास सुरुवात केली. याचवेळी तिने महिलेच्या उशीखाली ठेवलेली सोन्याची माळ चोरून घेतली. त्यानंतर कोणालाही संशय येऊ न देता ती तेथून निघून गेली.

काही वेळाने उशीखाली ठेवलेली सोन्याची माळ गायब असल्याचे ज्येष्ठ महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे लष्कर पोलिसांनी ३० ते ३५ वर्षांच्या अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गोड बोलून ज्येष्ठ महिलेच्या घरात घुसली तरुणी; आधी योजनेची माहिती दिली नंतर मालिशच्या बहाण्याने बेडरूममध्ये घुसून….

Monday, 23 November 2026, 18:51

पुणे हादरलं! विप्रोतल्या IT इंजिनिअर तरुणीचा मृत्यू; इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या बॉयफ्रेंडला अटक

Monday, 23 November 2026, 17:40

साडेसतरानळीत ओढ्याच्या पात्रातील बिल्डरची अतिक्रमण जमीनदोस्त करा! अमोल तुपे यांची मागणी

Monday, 23 November 2026, 17:11

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकला कारची जोरदार धडक, 56 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू

Monday, 23 November 2026, 16:13

आरक्षणावर तुकाराम मुंढेंचं अत्यंत रोखठोक भाष्य! एकदा लाभ मिळाल्यानंतर पुढच्या पिढीने… नेमकं काय म्हणाले?

Monday, 23 November 2026, 15:22

गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाचा मध्यरात्री ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा थरार! भरधाव कारने दोघांना उडवलं; दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू

Monday, 23 November 2026, 15:13
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp