Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरक्षणावर तुकाराम मुंढेंचं अत्यंत रोखठोक भाष्य! एकदा लाभ मिळाल्यानंतर पुढच्या पिढीने… नेमकं काय म्हणाले?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 23 November 2026, 15:22
पुणे : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली वैयक्तिक भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जात आरक्षण आणि महिला आरक्षणाबाबत एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी आरक्षण, सामाजिक विषमता आणि समान संधी याबाबत आपले विचार मांडले. कार्यक्रमानंतर पत्रकारांनीही याच मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी, एका पिढीला आरक्षणाचा लाभ मिळून ती विशिष्ट सामाजिक स्तरावर पोहोचल्यानंतर पुढील पिढीला आरक्षणाचा लाभ मिळू नये, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

आरक्षणाबाबत बोलताना मुंढे म्हणाले, “एकदा आरक्षण घेतल्यानंतर त्या विशिष्ट सामाजिक स्तरावर पोहोचल्यानंतर त्याचा पुन्हा वापर करायला नको, असे माझे वैयक्तिक मत आहे. याबाबत वेगवेगळी मतमतांतरे असू शकतात. मात्र, माझी भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे याबद्दल कोणी वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.”

आरक्षणाचे समर्थन करताना त्यांनी सामाजिक विषमता दूर करण्याची गरजही अधोरेखित केली. संविधानाची निर्मिती सर्वांना समान संधी मिळावी यासाठी करण्यात आली आहे. मात्र, समान संधी म्हणजे केवळ सर्वांना एकाच रेषेवर उभे करणे नव्हे, तर त्या रेषेपासून पुढे जाण्यासाठी सर्वांना सक्षम करणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत समाजात असमानता कायम आहे, तोपर्यंत आरक्षणाची गरज राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“माझे वैयक्तिक मत विचाराल तर आरक्षणाचा फायदा घेतल्यानंतर एका पिढीला शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या आणि ती विशिष्ट स्तरावर पोहोचली, तर पुढील पिढीला आरक्षणाचा फायदा मिळू नये. मात्र, त्यासाठी आधी त्या समाजाला त्या स्तरावर आणावे लागेल,” असे मुंढे म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाबाबत दहा वर्षांचा विचार मांडला होता आणि गरज असल्यास त्यात पुढे वाढ करण्याची भूमिका होती, असे सांगत आज आरक्षणाचा उपयोग कशासाठी होत आहे, याचा विचार नागरिकांनी करायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.

आरक्षणाचा लाभ खरोखरच अपेक्षित घटकांपर्यंत पोहोचला आहे का, हा प्रश्नही महत्त्वाचा असल्याचे मुंढे यांनी सांगितले. समाजात समानता निर्माण झाल्यानंतर आरक्षण संपले पाहिजे, असे आपले मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. मनातील जातीय, धार्मिक आणि सामाजिक उतरंड कमी करून समानतेला सुरुवात करण्याची जबाबदारी नव्या पिढीवर असल्याचे त्यांनी सांगितले.

समान संधी या संकल्पनेचा अर्थ समजावून सांगताना मुंढे यांनी स्पर्धा परीक्षांचे उदाहरण दिले. पदवीधर असलेली प्रत्येक व्यक्ती स्पर्धा परीक्षेला बसू शकते, ही संधीची एक समान पातळी आहे. मात्र, परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्वांकडे सारखी साधने आणि सुविधा नसतात. त्यामुळे केवळ परीक्षेला बसण्याची परवानगी देणे म्हणजे समान संधी नव्हे, तर त्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी आवश्यक क्षमता आणि सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

यासाठी त्यांनी पुणे-मुंबईतील चांगल्या महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि बीड किंवा गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे उदाहरण दिले. काही विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच चांगले शिक्षण, मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांचे क्लासेस उपलब्ध असतात. तर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मर्यादित सुविधांमध्ये होते. दोघेही पदवीधर असले तरी त्यांची तयारी आणि उपलब्ध साधने समान नसतात. त्यामुळे सर्वांना सक्षम बनवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समाजातील जातीय आणि लैंगिक भेदभावाचा उल्लेख करताना त्यांनी ऐतिहासिक सामाजिक बहिष्काराची आठवण करून दिली. महिलांनाही अनेक वर्षे शिक्षणाच्या समान संधी मिळाल्या नाहीत. काही वर्षांपूर्वी पदवीधर होणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी होते. तसेच देशाच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचलेल्या महिलांचे प्रमाण किती आहे, याचाही विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले.

आरक्षणाला ‘पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन’ असे संबोधत, वंचित घटकांना प्रत्यक्षात समान संधी मिळण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे मुंढे यांनी सांगितले. आरक्षणाचे निकष काय असावेत, यावर चर्चा होऊ शकते; मात्र सामाजिक विषमता दूर करून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आरक्षणाबाबत मांडलेली भूमिका ही आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आरक्षणाच्या लाभाचे निकष, सामाजिक समानता आणि पुढील पिढ्यांपर्यंत आरक्षणाचा लाभ सुरू ठेवण्याबाबतची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आरक्षणावर तुकाराम मुंढेंचं अत्यंत रोखठोक भाष्य! एकदा लाभ मिळाल्यानंतर पुढच्या पिढीने… नेमकं काय म्हणाले?

Monday, 23 November 2026, 15:22

गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाचा मध्यरात्री ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा थरार! भरधाव कारने दोघांना उडवलं; दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू

Monday, 23 November 2026, 15:13

Breaking News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात बॉम्ब ठेवल्याची अफवा! वकील आणि नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात

Monday, 23 November 2026, 14:52

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर शिवाई बस आणि दुचाकीची भीषण धडक; नाझरे येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू!

Monday, 23 November 2026, 14:51

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! पीएमपीएमएलकडून नव्याने १२ पूरक बसमार्ग सुरू; सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत मिळणार सेवा

Monday, 23 November 2026, 14:37

बोर्ड परीक्षेतही कॅल्क्युलेटर? सीबीएसई, एनसीईआरटीला दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

Monday, 23 November 2026, 14:26
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp