लहू चव्हाण
पाचगणी : वाई येथील एका कॅफेमध्येच अल्पवयीन विद्यार्थिनीवर बला-त्का-र झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे शहरातील संपूर्ण कॅफे पोलिसांच्या रडारावर आले आहेत.
समीर सलीम पटेल (वय २६ रा. कडेगाव ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाईतील चर्च परिसरात असणाऱ्या कॅफेमध्ये शहरातील नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आहे.
सध्या सर्वत्र लव्ह जिहाद वरून वातावरण तंग असतानाच ही घटना घडली असल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी आरोपी समीर पटेल (वय २६ रा. कडेगाव ता .वाई) याला अटक केली आहे.
या गंभीर घटनेमुळे वाई शहरातील सर्व कॅफे पोलिसांच्या रडारावर आले आहेत. तर शहरातील नाकरीकांनी अशा कॅफे चालकांचा निषेध केला आहे. तसेच त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांमुळे कॅफे चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.