शिरूर : गँगसाठी १० लाख रूपयाची खंडणी मागुन शतपावली करीत असलेल्या नागरिकाला शिरूर मुंबई बाजार येथुन रिक्षातून अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून ६ जणांना अटक केली आहे.
विशाल काळे, उमेश जगदाळे, अविष्कार लांडे, अक्षय परदेशी, कैलास ननवरे, देवानंद चव्हाण, हर्षल काळे, रूपेश लुनिया, अमोल लुनिया, दादा खिलारी, गोपाळ यादव रा. सर्व शिरूर व दोन अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अभिषेक ईश्वर गंगावणे (वय- २२ रा. मुंबई बाजार शिरूर ता. शिरूर) असे अपहरण करून खंडणी मागितलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गंगावणे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १५) संध्याकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिरूर मुंबई बाजार येथे अभिषेक गंगावणे हे शतपावली करीत होते. यावेळी वरील सर्वजण सहा सिटर रिक्षा मधुन सदर ठिकाणी आले व तलवारी, कोयता लोंखडी रॉड लाकडी दांडके घेउन येउन १० लाख रूपयाची खंडणी मागुन मारहाण करण्यास सुरुवात केली. व बळजबरी रिक्षा मध्ये बसवुन अपहरण करून शिरूर येथील दशक्रिया घाट येथे नेउन गँगसाठी १० लाख रूपयाची खंडणी मागितली. यावेळी दहशत निर्माण करून तलवारी, कोयता, लोंखडी रॉड, लाकडी दांडके व हॉकीस्टीक यांनी अभिषेक ईश्वर गंगावणे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून जखमी केले.
यावेळी गोपाळ यादव याने अभिषेक गंगावणे यांना फोन करून तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून अभिषेक गंगावणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.
पोलिसांनी अविष्कार संभाजी लांडे (वय-२२ रा. सोनार आळी, शिरूर), अक्षय महेंद्रसिंग परदेशी (वय-२३, रा. काचेआळी, शिरूर), कैलास लक्ष्मण ननवरे (वय-२३ रा. रामलींग ता. शिरूर), हर्षल मनोहर काळे (वय-२२ रा. ढोरआळी, शिरूर), अमोल हेमंत लुनिया (वय-२७ रा. रामलींग रोड, शिरूर), अमोल उर्फ दादा अंकुश खिलारे (वय-२५ रा. लाटेआळी, शिरूर यांना अटक करण्यात आलेली असुन मंगळवार (ता. २०) पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. उर्वरीत आरोपीत यांचा शोध घेणेकामी शिरूर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस पथक तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, सदर गुन्हयातील आरोपीपैकी काही आरोपीत हे खुनाच्या गुन्हयातुन जामीनावर सुटलेले असुन त्या आरोपीतांनी वरील प्रमाणे टोळी करून शिरूर शहरामध्ये दहशत निर्माण करून लोंकाना खंडणीची मागणी करीत असल्याची गोपनिय माहीती मिळत आहे. याच प्रमाणे वरील आरोपीनी आणखी कोणास खंडणी मागीतली असल्यास किंवा खंडणी उकळली असल्यास त्याबाबत शिरूर पोलीस ठाणे येथे तकार दयावी. त्यांचेवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असे शिरूर पोलिसांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी शिरूर यांचे मागदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, अभिजीत पवार, विक्रम जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक नजीम पठाण, फौजदार गणेश देशमाने, नाथा जगताप, बाळु भवर, राजेंद्र गोपाळे, विनोद काळे, संतोष सांळुखे, प्रविण पिठले, सचिन भोई यांच्या पथकाने केली आहे.