Shirur News : पोलीस निरीक्षक संजय जगताप यांची शिरूर तालुक्यात सिंघम एन्ट्री झाली आहे. शिरूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच त्यांनी कारवाई करण्यास सुरवात केली आहे.(Shirur News)
७५ जणांकडून तब्बल ८३ हजार रुपयांचा दंड.
शिरूर येथील सि.टी.बोरा कॉलेजच्या रस्त्यावर थांबून पोलिसांनी शहरातील रोड रोमियो ,ट्रिपल शिट, विना लायसन गाडी चालविणे, विना नंबर प्लेट, ब्लॅक फिल्मलिंग यांच्यावर दंडात्मक कारवाई सोमवारी (ता.१७) केली आहे. या कारवाईत ७५ जणांकडून तब्बल ८३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.(Shirur News)
दरम्यान, या कारवाईत लहान मुले गाडी चालवीत असताना आढळून आले. त्यांनतर पोलिसांनी त्या मुलांच्या पालकांना बोलाऊन समज दिला आहे. आणि लहान मुलांना सोडून दिले.(Shirur News)
हि कारवाई पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील,सहायक फौजदार अनिल चव्हाण, गणेश देशमाने, पोलीस नाईक राजू वाघमोडे, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, संतोष साळुंखे, शेखर झाडबुके, अर्जुन भालसिंग, प्रवीण पिठले, नितेश थोरात व महिला पोलीस नाईक भाग्यश्री जाधव यांनी केली आहे.(Shirur News)
याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक संजय जगताप म्हणाले कि, सर्व नागरिकांनी गाडी चालवीत असताना वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे. १८ वर्षापेक्षा लहान मुलांना पालकांनी गाडी देऊ नये. या प्रकारच्या कारवाया दरदिवस केल्या जाणार आहेत. जर वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करताना कोणी आढळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.