Shirur News : हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजगणाव सांडस (ता. शिरूर जि. पुणे) येथे सोमवारी (ता.१७) घडली आहे. याप्रकरणी पतीसह सासू- सासऱ्यांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.(Shirur News)
शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
काव्या किशोर निंबाळकर (वय-२२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी काव्याची आई सुरेखा शहाजी बांदल (वय ४२, व्यवसाय शेती रा. बोरी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काव्याचा पती किशोर संजय निंबाळकर, सासु लता संजय निंबाळकर व सासरे संजय विनायक निंबाळकर (सर्व रा. राजणगाव सांडस ता. शिरूर जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Shirur News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काव्याचा राजणगाव सांडस येथील किशोर निंबाळकर यांच्यासोबत विवाह झाला होता. विवाहाच्या काही दिवसानंतर सासरकडील मंडळींनी काव्याला हुंडा म्हणून भांडे, पैसे, दागीने व साडयाची मागणी केली. तेव्हा काव्याने या मागणीला विरोध केला. तेव्हा सासरकडील मंडळींनी काव्याला शिवीगाळ करून मारहाण केली.(Shirur News)
सासरकडील मंडळी माहेरकडून हुंडा आणण्यासाठी काव्याकडे नेहमी तगादा लावत होते. काव्याने नकार दिल्यानंतर तिला मारहाण केली जात होते. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून काव्याने आत्महत्या केली.(Shirur News)
दरम्यान, काव्याची सासु लता संजय निंबाळकर हीने काव्या गरोदर असताना. काव्याला डॉक्टरांनी जड समान उचलू नये व आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरीही सासु लता यांनी काव्याला जड उचलण्यास सांगितले. त्यामुळे काव्याच्या दोन महीन्याच्या गर्भपात झाला होता. यासाठी सासू लता कारणीभूत आहेत.(Shirur News)
अशी फिर्याद काव्याची आई सुरेखा बांदल यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार काव्याच्या पतीसह सासू- सासऱ्यांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.