Shirur News शिरुर : आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदार संघात ४२ गावांमध्ये दळववळणाचे साधन भक्कम व्हावे. यासाठी बेल्हा-जेजूरी व अष्ठविनायक रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. या मार्गावरील रस्ते झाल्याने दळणवळण व वर्दळी ठिकाण म्हणून हा परिसर ओळखू जाऊ लागला. (Shirur News) पण या रस्त्यांवर अवैध धंदे फोफावल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र पोलिसांना याबाबत माहिती असुनही, पोलिस मात्र त्याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. (Shirur News)
आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातून अष्टविनायक व बेल्हा जेजूरी रस्ता तयार करण्यात आला आहे. यासाठी कोट्यावधी रूपये शासनाने खर्च केला आहे. यामुळे या रस्त्यावर राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी या भागातून प्रवास करू लागले आहेत. टूरर्स व ट्रव्हल्स च्या मोठ्या लक्सझरी गाड्या या भागातून प्रवास करताना दिसतात.
हे रस्ते रांजणगाव महागणपती ला जाण्यासाठी सोयीस्कर झाल्याने या भागात सध्या मोठ्या प्रमाणात वहातूक सुरू आहे. जेजूरी येथील खंडोबा देवस्थानला जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वहातूक सुरू आहे. रस्ता सोयीस्कर झाला असला तरी या भागात गाव तेथे ढाबे झाल्याने दारू धंदे मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने या भागातील प्रवासी व नागरिक पोलिस कारवाई बाबत वेगवेगळ्या चर्चा करू लागले आहेत.
आंबेगाव व शिरूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत या भागावर कायदा व सुव्यवस्था नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस खाते मात्र बघ्याची भुमिका घेत असल्याचे दिसून येत आहेत. राजरोसपाने चालणाऱ्या दारूधंद्याना येथे पोलिसांचा वचक नसल्याने या परिसरात रस्त्यांवर दुर्घटना होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या ४२ गावांमधील अवैध दारूधंद्यावर तत्काळ कारवाई व्हावी. अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.
दरम्यान, आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदार संघात नव्याने परवानाधारक दुकाने उघडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आषाढ महिना म्हटल्यावर सुकी ओली पार्टी साठी खवय्ये मोठ्या प्रमाणात हॅाटेल व ढाब्यांवर गर्दी करतात. त्यातून अवैध धंद्याना सुळसुळाट झाल्याने रस्त्यांवरील अपघात वाढले आहेत. चौफुल्यांवर कारवाईसाठी पोलिस नसल्याने वाहतूकीबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तसेच हप्ते वसुलीसाठी चारचाकी फिरत असल्याची चर्चा या भागात चांगलीच रंगली आहे.
मदत केंद्र व अग्नीशामक केंद्रांचा अभाव
बेल्हा – जेजूरी व अष्टविनायक रस्ते तयार करण्यासाठी शासनाने कोट्यावधी रूपये खर्च केला आहे. मात्र समृद्धी मार्गावर सिंदखेड राजा येथे झालेल्या अपघातासारखा अपघात येथे घडल्यास येथे मदतकेंद्र व अग्निशामक केंद्र नसल्याने वाहतूकीदरम्यान मदती होण्याबाबतच्या शंका उपस्थित केल्या जात आहे. या रस्त्यावर मात्र जागोजागी ढाबा व हॅाटेल मधून अवैध दारू मिळत असल्याने पोलिसांच्या कारवाई बाबत शंका उपस्थित केली जात आहे. या महामार्गावर गतीरोधकाजवळ मोठ मोठी दगडी देखील लावण्यात आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.