अक्षय भोरडे
Shirur News : तळेगाव ढमढेरे : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे शेतजमिनीच्या वादातून एका व्यक्तीसह त्याच्या पत्नीला मारहाण करत कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नारायण रामचंद्र पवार, शिवाजी पवार, राजू पवार, धनंजय राजू पवार, दादाभाऊ पवार यांसह पाच अज्ञात व महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच अज्ञात व महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला;
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे महेश गोवर्धन यांच्या आईच्या नावावरील वडिलोपार्जित शेती होती. आईचे निधन झाल्यानंतर आईच्या पश्चात या जमिनीचे रेकॉर्ड महेश यांच्या नावे झाले. सद्यस्थितीत महेश शेतजमीन कसण्यासाठी पत्नी व कामगारांसह शेतात गेलेले असताना या शेतात नारायण पवार, शिवाजी पवार यांसह अज्ञात व्यक्ती व काही महिला आल्या. त्यांनी महेश यांसह त्यांच्या पत्नी व कामगरांना शिवीगाळ, दमदाटी करत ‘तुम्ही या जमिनीत यायचे नाही, ही जमीन आम्हाला पाहिजे’ असे म्हणून महेश यांना दगडाने मारहाण करत जखमी केले. तर काही जणांनी महेश यांच्या पत्नीला धक्काबुक्की केली. Shirur News
दरम्यान, महेशचे कामगार घाबरून पळून गेले, घडलेल्या प्रकाराबाबत महेश पुरुषोत्तम गोवर्धन (वय ४३, पर्वती, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी नारायण रामचंद्र पवार, शिवाजी पवार, राजू पवार, धनंजय राजू पवार, दादाभाऊ पवार यांसह पाच अनोळखी इसम व महिला (सर्व रा. निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर जि. पुणे( यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.