(Shirur Crime) शिरुर : गोरक्ष दलाने कत्तलखान्यात जाणाऱ्या 100 म्हशी व रेडकुंचे वाचवले प्राण वाचवून मोठी कामगिरी बजावली आहे. सदर घटना निघोज या ठिकाणी घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील निघोज मार्गे कल्याण येथील कत्तलखान्याकडे चार टेम्पोतून 94 म्हशी आणि त्यांचे रेडकू यांची वाहतुक करत असताना निघोज या ठिकाणी निडर गोरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवार (दि 5 ) रोजी ती वाहने अडवून पोलिसांच्या स्वाधीन केली.
पारनेर पोलिस स्टेशनला फिर्याद…!
याबाबत गोरक्षक अक्षय कांचन यांनी पारनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. घटनेविषयी पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जनावरांना पांजरपोळ येथे हलविणयात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार…!
टेम्पो क्रमांक MH 03 DV 3968, MH 03 DV 4641, MH 03 DV 7730, MH 03 DV 7731 या चार टेम्पोमध्ये 94 म्हशी आणि त्यांचे रेडकू भरुन कत्तलीसाठी नेताना निघोजमध्ये (दि 5) रोजी पहाटे 1 वाजता गोरक्षक दल आणि निघोज येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी पकडून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. जावेद शेख आणि मतलब कुरेशी या दोन व्यापाऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण येथून कत्तल खाण्यासाठी म्हशीचे रेडकू चार टेम्पोगाडीतून कत्तल खाण्यासाठी प्रत्येक गाडीमध्ये दोन कसाई आणि एक ड्रायव्हर अशा पद्धतीने फलटण जि. सातारा येथून पुणे -शिरूर -निघोज आळेफाटा -कल्याण मुंबई येथे जाणार होत्या.
परंतु उरुळी कांचन येथील गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना याचा सुगावा लागल्यामुळे त्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि निघोज येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या गाड्या ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्या. निघोज ग्रामस्थ आणि उरळीकांचन ग्रामस्थ यांच्यातर्फे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
गोरक्ष दलाचे कार्यकर्ते अक्षय कांचन, निखिल बत्ते, संदीप कावरे, रमेश औटी, धीरेश महांडुळे, ऋषिकेश बोरुडे, शेखर हांडे, वैभव मोरे, ऋषिकेश कामठे, धनश्री म्हस्के, त्याचप्रमाणे भीमदादा लामखडे, बाळासाहेब जगताप, किरण लाळगे, दीपक लाळगे, सत्यम गायखे, शिवम गायखे, योगेश खाडे, शुभम धवन, संकेत कवाद, विलास हारदे यांनी ही बेधडक कारवाई केली आहे.