Ship Wrecked | माल्टा : लिबियातील टोब्रुक इथून ही बोट ४०० नागरिकांना घेऊन चालली होती. हे जहाज ग्रीस आणि माल्टा यादरम्यान च्या समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली.
अपघातात २ जणांचा मृत्यू…
या अपघातात २ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर २० हून अधिक प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहेत.
दरम्यान, या जहाजाचा अपघात नेमका कसा झाला. याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. नेमकं काय घडलं ज्यामुळे ही बोट बुडाली. याबाबत अजून काही समजू शकलं नाही.
सपोर्ट सर्व्हिस अलार्म फोनने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, एका रात्रीत लिबियातील टोब्रुक येथून निघालेल्या बोटीसोबत दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली. मात्र तातडीने मदकार्य पोहोचण्यात काही अडचणी येत होत्या.
जर्मन एनजीओ सी-वॉटर इंटरनॅशनलने दिलेल्या माहितीनुसार, जहाज ज्या ठिकाणाहून जात होती तिथे मृत्यूचा सापळा असल्याचे म्हटले, त्यामुळे मदत करण्यासाठी देखील उशीर होत होता. त्यांनी EU ला पुढील कारवाई आणि मदकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Vaduj News : कामाचे बिल न मिळाल्याने अपंग ठेकेदाराने केले विष प्राशन ; वडूज येथील घटना
Vaduj News : भाजप सावरकर गौरव यात्रेला वडूज हुतात्मा नगरीत उदंड प्रतिसाद
Pune Accident : ह्रदयद्रावक ! खेळता खेळता तीन वर्षाच्या चिमुकलीला काळाने हिरावून नेले