Shikrapur News : लोणी काळभोर, (पुणे) : शेतात काम करीत असलेल्या एका महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून घेऊन गेलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ जबरी चोरी, ३ घरफोडी, १ वाहनचोरी व १ चोरीचा गुन्हा केल्याची कबुली सदर आरोपीने पोलिसांना दिली आहे. (Forced burglary, house burglar arrested by Shikrapur Police; 8 Crime detection)
तब्बल ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
याप्रकरणी सुनिता नवनाथ माने, वय ३३, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. निखील विजय पलांडे, रा. मुखई, ता. शिरूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून (Shikrapur News) त्याच्याकडून पोलिसांनी एका चारचाकी गाडीसह ९ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ” सुनिता माने या शेतात काम करीत असताना २५ ते ३० वयाच्या चोरट्याने सुनिता माने यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचे गळयातील दिड तोळा वजानाचे मनीमंगळसुत्र व कानातील कर्णफुले बळजबरीने चोरून नेले होते. (Shikrapur News) याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटना गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपास करीत असताना पोलिसांना एका खबऱ्याकडून तसेच सी.सी.टी.व्ही. फुटेज व रेकॉर्डवरील आरोपीवरून सदरचा गुन्हा हा निखिल पलांडे याने केल्याचा संशय होता. त्याअनुषंगाने पोलीसांनी आरोपीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता, (Shikrapur News) सदर आरोपी निखील विजय पलांडे हा वेषांतर करून व नाव बदलुन लोणावळा येथे राहत असल्याची माहीती पोलीसांना मिळाली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने आरोपीकडे विचारपुस केली असता, आरोपीने मागील सहा महीन्याच्या कालावधीमध्ये शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ जबरी चोरी, ३ घरफोडी, १ वाहनचोरी व १ चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. (Shikrapur News) त्याच्याकडून पोलिसांनी एका चारचाकी गाडीसह ९ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांचे मार्गदशनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रणजित पठारे व पोलीस नाईक अमोल नलगे हे करीत आहेत.