(Shikrapur Crime) शिरुर : जनावरांसाठी चारा आणण्यासाठी दुचाकीवरून जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे चाललेल्या एका व्यक्तीला भररस्त्यात अडवून सोनसाखळी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना (Shikrapur Crime) शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.
शिवाजी बाळू शेंडकर (वय २३ रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे) व सचिन काळूराम दौंडकर (वय ३३ रा. शेलपिंपळगाव ता. खेड जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी पप्पू हमीद शेख (वय ५२ रा. महाबळेश्वर नगर, शिक्रापूर ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांचे दोन साथीदार फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू शेख हे १ फेब्रुवारीला जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे दुचाकीहून जनावरांसाठी चारा आणण्यासाठी चालले होते. दुचाकीवरून जात असताना, शेख यांना दुचाकीहून आलेल्या युवकांनी गाडी थांबविण्याचा इशारा केला. आणि पप्पू शेख यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून पसार झाले. याप्रकरणी पप्पू शेख यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, आरोपी शिवाजी शेंडकर व सचिन दौंडकर यांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने सदर गुन्हा केला आहे. अशी माहिती शिक्रापूर पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने सदर गुन्हा केला असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. आरोपींचे दोन्ही साथीदार फरार असून पोलीस मागावर आहेत. पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे व पोलीस नाईक अमोल नगले करीत आहेत.
ही कामगिरी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, अमोल दांडगे, लखन शिरसकर, अमोल नगले, जयराज देवकर, किशोर शिवणकर आणि निखील रावडे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
किंग ऑफ शिक्रापूर: हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!!!
दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन तरुणांना शिक्रापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
शिक्रापूर परिसरात कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल ; शिक्रापूर पोलिसांची कामगिरी..!