Loni Kalbhor लोणी काळभोर, ता. 25 : लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरात गांजा विक्री करणाऱ्या एका अट्टल तस्करास लोणी काळभोर पोलिसांकडून 2 वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे. Loni Kalbhor

शेरखान सुधाखान पठाण (वय 51, रा. किरण बेकरी जवळ लोणी स्टेशन लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरखान पठाण यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेबद्दल नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होवु नये. म्हणून गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी शेरखान पठाणचा अभिलेख तपासून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांना पाठविला होता. Loni Kalbhor

गुन्हेगारीवृत्तीस आळा घालण्यासाठी अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार शेरखान पठाण याच्यावर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणे आवश्यक होते. म्हणुन त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56(1)(अ)(ब) प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामिण जिल्ह्याच्या हद्दीतुन गुन्हेगारांना 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आलेले आहे. असे आदेश पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी पारित केले आहेत. Loni Kalbhor
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर , पोलीस हवालदार विलास शिंदे , वैजिनाथ शेलार , रवी आहेर, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, योगिता भोसुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. Loni Kalbhor







