Daund News : दौंड, (पुणे) : अहिल्यानगरकडून साताऱ्याच्या दिशेने गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा दौंड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शुक्रवारी (ता. 24) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली. या कारवाईत 13 लाख 7 हजार रुपयांचा तब्बल 52 किलो गांजा आणि 10 लाखांची कार असा एकूण 23 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुकेश धर्मिया कणोजे (वय-36, रा. बलवाडी, ता. बडवानी, राज्य मध्यप्रदेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Daund News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना 24 एप्रिल रोजी पहाटे माहिती मिळाली की, एका किया कारमधून (MP 09 AT 2117) गांजाची मोठी खेप नेली जाणार आहे. माहिती मिळताच पवार यांनी तातडीने पथक तयार केले आणि दौंड-पाटस रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ बॅरिकेट्स लावून नाकाबंदी केली. Daund News

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास संशयित कार नाकाबंदीच्या ठिकाणी आली. पोलिसांनी इशारा केला असता चालकाने कार थांबवण्याऐवजी बॅरिकेट्सला कट मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगात असलेल्या या कारने पुढे जाणाऱ्या दुसऱ्या एका कारला (MP 13 ZV 8824) पाठीमागून जोरदार धडक दिली. या संधीचा फायदा घेत पोलीस पथकाने कारला वेढा घातला आणि चालकाला बाहेर काढले. Daund News
कारची झडती घेतली असता, पोलिसांना प्लास्टिक चिकटपट्टीने गुंडाळलेली 5 मोठी पाकिटे आढळली. त्यामध्ये 13 लाख 7 हजार रुपयांचा तब्बल 52 किलो 30 ग्रॅम गांजा सापडला. पोलिसांनी गांजासह 10 लाख रुपये किमतीची सोनेट किया कार जप्त केली आहे. यावेळी गाडीतील आरोपीला नाव व पत्ता विचारले असता आरोपीने त्याचे नाव मुकेश कणोजे असल्याचे सांगीतले. आरोपीविरुद्ध दौंड पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Daund News
ही कारवाई पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, चौधरी, साळुंखे व पोलीस हवालदार राउत, बोराडे, पांढरे, संजय कोठावळे, तुमकुटे, हजारे, पवन माने या पोलीस पथकाने पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करत आहेत. Daund News







