नंदुरबार : सहलीत अधिक्षीकेचा विनयभंग केल्याप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला शहादा पोलीसांनी अटक करण्यात आली आहे.
आर.जे. मुसळे असे करण्यात आलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाची विद्यार्थ्यांसमवेत वेरुळला सहल गेली होती. ही सहल ३० सप्टेंबरला परतीच्या मार्गावर होती’. त्यावेळी प्रवासा दरम्यान अंधाराचा फायदा घेत बसमधील शेजारच्या सीटवर बसुन शिक्षण विस्तार अधिका-याने अधिक्षीकेशी अश्लील चाळे करून विनयभंग केला.
संबंधीत अधिक्षीकेने झालेला प्रकार एक तारखेला प्रकल्प अधिकारी यांना सांगितला. यानंतर संबंधीत पिडीत अधिक्षीकेला दामिनी पथकाकडे पाठवण्यात आले होते. त्यानंतर तिने शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार दाखल होताच शहादा पोलिसांनी आरोपी मुसळे याला अटक केली आहे. तरी, पुढील तपास शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर करीत आहेत