लोणी काळभोर (पुणे)– पुणे शहरातील दोन नंबरवाल्यांना सळोकीपळो करुन सोडणारे व पुर्व हवेलीमधील इंधन चोरांची पाळेमुळे खणुन काढणारे सामाजिक सुरक्षा विभागाचे डॅसिंग वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांची बदली करण्यात आली असुन, त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे पत्र मिळताच पुराणीक यांनी सामाजिक सुरक्षा विभागाचा पदभार सोडला असुन, पो.नि.विजय कुंभार यांनी पुराणईक यांच्या जागी पदभार स्वीकारला आहे.
पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दतील दोन नंबरवाल्याच्यावर रेड मारण्यात अग्रेसर असणारे राजेश पुराणिक यांची बदली झाल्याने, पुणे शहरात चर्चांना पेव फुटले राजेश पुराणीक यांनी दिड महिण्यापुर्वी भारत पेट्रोलयम कंपणीत चालणाऱ्या इंधन चोरीवर छापा टाकुन, आत्तापर्यंत वीसहुन अधिक टॅंकर इंधन चोरीत सामिल असल्याच्या संशयावरुन ताब्यात घेतले आहेत. पुराणीक यांची बदली झाल्याचे समजताच, पुर्व हवेलीमधील इंधन माफिया आनंदाने बेभान झाले होते. मात्र सामाजिक सुरक्षा विभागातुन पुराणीक यांची बदली झाली तरी, इंधन चोरीचा तपास राजेश पुराणीक करणार असल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान पुणे पोलीस दलाच्या (Pune Police) समाजिक सुरक्षा विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक कांही लोकांना पुराणिक मारहाण करीत असल्याचा ‘व्हिडिओ’ चार दिवसांपूर्वी ‘व्हायरल’ झाला होता. या प्रकरणात एका महिलेने महिला आयोगामध्ये तक्रार दिली होती. त्यावर आयोगाने योग्य तपास करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात दिले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक पुराणिक यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.
राजेश पुराणीक यांच्याकडे सामाजिक सुरक्षा विभागाचा अतीरिक्त पदभार होता. या काळात पुराणीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागामार्फत पुणे शहरात असलेल्या हॉटेल्स, बारमध्ये पहाटेपर्यंत तरुणाईच्या सुरू असलेल्या हुक्कापार्ट्यांच्या विरोधात जोरदार कारवाई गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर देखील या विभागाकडून कारवाई सुरू होती. या कारवाईमुळे विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक नवनवीण दोन नंबरचे धंदे वरीष्ठ अधिकाऱ्यांना समजत होते. यामुळे दोन नंबर वाल्यांना पाठीशी घालणाऱ्या अनेक आधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. पुराणिक यांच्यामुळे शहरातील अवैध धंद्यांना आळा बसला होता. पुराणिक यांनी तब्बल ४० ठिकाणी या कारवाई केली. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या स्तरावरील आधिकाऱ्यांनी पुराणिक यांचा धसका घेतला होता.
दरम्यान पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुर्व हवेलीमधील तेल कंपण्याच्या डेपोतुन इंधन चोरी होत असल्याच्या संशयावरुन, महिनाभऱापुर्वी तरडे परीसरात कारवाई केली होती. या कारवाीची चौकशी अद्यापही चालु असुन, पोलिसांनी मागिल महिनाभऱात भारत पेट्रोलियम कंपणीच्या डेपोमधील तब्बल एकविस टॅंकर चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. जप्त केलेल्या बहुतांश टॅंकरमध्ये चोर कप्पे असल्याचा संशय पोलिसांना असुन, या गोरख धंद्यात भारत पेट्रोलियम कंपणीचे कांही वरीष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा संशयावरुन पोलिसांनी संशयित अधिकारी व वहातुकदारांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. पुराणीक यांनी इंधन माफियांच्यावर केलेली वरील कारवाई मागिल चाळीस वर्षाच्या काळातील सर्वात मोठी कारवाई ठरलेली आहे.
या कारवाईमुळे अनेक इंधन माफियांचे कारणामे व त्यांना इँधन चोरीस साथ देणारे अधिकारी यांची पोलखोल झालेली आहे. यामुळे याप्रकऱणाचा तपासअंतीन टप्प्यात आला असतांना, बदली झाल्याने या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र वरील तपास पुरणीक साहेबांच्याकडेच राहणार असल्याने, तुर्त तरी इंधन माफिया गॅसवरच राहणार हे स्पष्ठ झाले आहे.