अजित जगताप
Satara News | सातारा (वडूज) : उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून उन्हामुळे अंगाची लाहलाही होत असतानाच स्वयंपाक करताना घरगुती गॅस सिलेंडरची गळती झाल्याने स्फोट झाल्याचा धक्कादायक घटना घडली. यात दोन वयोवृद्ध महिला जखमी झाल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली.
ताराबाई नाना आवळे (वय ७५) व सत्यभामा बळवंत खुडे (वय ७०) असे जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वडूज नगरीतील दलित- शोषित- कष्टकरी व शेतमजूर वस्ती असणाऱ्या इंदिरानगरमध्ये माय- लेकी राहत होत्या. रात्रीच्या जेवण बनवण्याच्या घाई गडबडीमध्ये सिलेंडरने पेट घेतल्यामुळे ताराबाई आणि त्यांच्याकडे शेजारी बसण्यासाठी आलेल्या सत्यभामा या दोघींना भाजले.
या स्फोटात घरगुती साहित्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. शनिवारच्या बाजारातून आणलेल्या वस्तू त्यांनी ठेवले होत्या. त्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्या दोघींना प्राथमिक उपचारासाठी वडूज येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर १०८ शासकीय रुग्णवाहिकेने त्यांना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Satara News | भाजप आमदार गोरे यांच्यासाठी माजी आमदार डॉ. येळ गावकर यांनी उचलला दगड
Satara : वडुज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीशिवाय पर्याय राहिलेला नाही माजी आमदार प्रभाकर घार्गे