Satara News : सातारा : साताऱ्यातील पेट्री येथील राज कास हिल रिसाॅर्टवर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. यामध्ये सहा बारबालांसह २४ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून डिस्को लाईट, साऊंड सिस्टीम, मोबाईल यासह रोख रक्कम असा सुमारे ८२ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
सहा बारबालांसह २४ जण ताब्यात
राज कास हिल रिसाॅर्टमध्ये पुण्याहून बारबाला आणून रात्री उशिरापर्यंत नाचविल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास राज रिसाॅर्टवर छापा टाकला. त्यावेळी तेथे सहा बारबाला आक्षेपार्ह अवस्थेत नाचत होत्या. (Satara News) त्यांच्यासमोर १८ जण बसले होते. यातील काहीजण बारबालांवर पैसे उधळत होते. पोलिसांनी तातडीने रिसाॅर्टचे दरवाजे बंद केले. मात्र, मागच्या दरवाजाने हाॅटेल मालक नंदू नलवडे (रा. नागठाणे, ता. सातारा) तसेच मॅनेजर, वेटर्स तेथून पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले.याप्रकरणी रिसाॅर्टचे मालक, मॅनेजर, वेटर्ससह २४ जणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी रात्री एक वाजता करण्यात आली.
विविध कलमान्वये गुन्हे दाखल
पोलिसांनी छापेमारीच्या कारवाईसाठी एक पथक तयार केले. पथकाला घेऊन त्यांनी बार गाठले. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये संशयितांवर गुन्हे दाखल केले. (Satara News) यामध्ये प्रिमायसेस परवान्याचे नूतनीकरण न करता रिसाॅर्टमध्ये विना नोकरनामा सहा महिलांना हाॅटेल मालकाने कामावर ठेवणे, या संदर्भातही गुन्हा दाखल करण्यात आला.