Saswad News : सासवड (ता. पुरंदर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवारवाडी येथील वळणाजवळ आयशर चालकाला अडवून, मारहाण व लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षेसह प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश न्यायाधीश पी पी जाधव यांनी दिले आहेत. (Saswad News)
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा.
सलीम उर्फ डी बादशहा बाबु तांबोळी (वय-२६, रा सव्हे नं ११०/११, बुद्ध विहार जवळ, शांती नगर झोपडपट्टी येरवडा पुणे) व रोहन नंदकिशोर नागे (वय-२४, रा. सय्यदनगर गल्ली नं २१ हडपसर) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गणेश काळूराम भंडलकर (रा. देहूगाव, ता. हवेली) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर गुन्हा हा नोव्हेबर २०१६ मध्ये घडला होता. (Saswad News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश भंडलकर हे एक आयशर गाडीवर चालक म्हणून काम करीत होते. तर त्यांच्या गाडीवर सिंकदर सत्तार शेख हा क्लिनर म्हणून काम करीत होता. भंडलकर हे बारामती येथून ब्रिटानिया कंपनीचे दही आयशर मधून भरून पुण्यात पोच करीत होते. (Saswad News)
भंडलकर हे बारामतीतून कंटेनरमध्ये दही भरून पुण्याकडे चालले असताना, त्यांचा कंटेनर पवारवाडी येथील वळणाजवळ आला असता, त्यांच्या कंटेनरला दोन इसमांनी दुचाकी आडवी लावली. आणि गणेश भंडलकर व सिंकदर शेख यांना कोयत्याने मारहाण करून लुटले. त्यानंतर दोघेजण दुचाकीवरून पसार झाले. (Saswad News)
याप्रकरणी भंडलकर यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सासवड पोलीस ठाण्यातील इतर गुन्ह्यात या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. व दोन्ही आरोपी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र हे दोन्ही आरोपी हे चालकाला मारहाण केल्याचा गुन्ह्यातील होते. (Saswad News)
दरम्यान, चालकाला मारहाण केल्याचा खटला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. चंद्रकिरण साळवी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना १० वर्षे शिक्षा व प्रत्येकी एक लाख रुपये दंड व भादवि क ३४१ खाली तीन महिने शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची ठोठाविली आहे. हे आदेश न्यायाधीश पी पी जाधव यांनी दिले आहेत. (Saswad News)
या खटल्यात सरकारी वकील ॲड. ॲड. चंद्रकिरण साळवी यांना सासवडचे सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, आर व्ही माळेगावे, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत, संदीप चांदगुडे यांची मदत मिळाली. (Saswad News)