Saswad News : लोणी काळभोर गराडे (ता. पुरंदर) येथील इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तब्बल १० वर्षानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ३ वर्ष तुरुंगवास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश शिवाजीनगर सेशन कोर्टाचे न्यायाधीश एस जी वेदपाठक यांनी दिले आहे.(Saswad News)
७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली आहे.
अमित बाळासाहेब बडदे (रा. कोडीत बुद्रुक, ता. पुरंदर, जि.पुणे) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.(Saswad News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी या २१ ऑगस्ट २०१३ साली घरी एकट्याच होत्या. तेव्हा दुपार ३ च्या सुमारास दरवाजा कोणीतरी वाजवला. परंतू तरुणीने दरवाजा उघडला नाही. त्यावेळी(Saswad News)
आरोपी अमित याने दरवाजावर लाथ मारून दरवाजा तोडला. आणि घरात आल्यानंतर आरोपी अमित बडदे तरुणीला म्हणाला कि, माझ्याशी फ्रेंडशिप कर. तेव्हा तरुणीने त्यास नकार दिला व ‘मी फेंडशिप करणार नाही, तुझा व माझा काहीएक संबंध नाही’ असे ठणकावून सांगितले.(Saswad News)
त्यानंतर आरोपीने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यावेळी तरुणी मोठ मोठ्याने आरडा ओरडा करू लागली. म्हणून आरोपीने तरुणीचे तोंड एका हाताने दाबून विनयभंग केला. व तरुणीला भितीवर ढकलून दिले. आणि आरोपी पोबारा करून पळून गेला. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात आरोपी अमित बडदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.(Saswad News)
पुणे जिल्हा सत्र न्यायालयात या गुन्ह्याचा खटला सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. सुनील हांडे यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधायक कलम ३५४ खाली ३ वर्षाचा साधा कारावास व ३ हजार रूपये दंड, कलम ४५२ खाली ३ वर्ष साधा कारावास व ३ हजार रुपये दंड व कलम ३२३ खाली १ वर्ष साधा कारावास व १ हजार रुपये दंडाची ठोठाविली आहे. हे आदेश न्यायाधीश एस जी वेदपाठक यांनी दिले आहेत.(Saswad News)
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील ॲड. सुनील हांडे यांना सासवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एस एस जाधव, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत, के.के.जेधे, संदीप चांदगुडे यांची मदत मिळाली.