Saswad | लोणी काळभोर : खासगी चारचाकी वाहनावर विधानसभा सदस्य अर्थात आमदार असल्याचा स्टिकर लावून फिरणाऱ्या बोगस आमदाराला सासवड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी या महाठगास ताब्यात घेऊन त्याच्यावर ६ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यात एक कार एक गोलाकार स्टिकर लाऊन फिरत होती. त्यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आणि मध्यभागी अशोक स्तंभ व हिरव्या रंगाचे स्टिकर कारच्या समोरील बाजूस चिकटवलेले दिसून आले होते. पोलिसांनी त्या कारचा पाठलागही केला होता. परंतु ती कार सापडली नव्हती.
जेजुरी नाक्यावर नाकाबंदी सुरू…
दरम्यान, जेजुरी नाक्यावर नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना आमदारकीचे बॅनर लावलेली क्रेटा कार दिसली. त्या कारवर अशा प्रकारचे स्टिकर लावलेले होते. कारमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा कारमध्ये आमदार महोदय वगैरे कोणीही नव्हते. किंवा ही कार आमदार महोदयांच्या मालकीचीही नव्हती. तर ही कार ऋतुराज गायकवाड (रा.काळेवाडी) यांच्या मालकीची असल्याचे समोर आले.
या क्रेटा कारला फॅन्सी नंबर प्लेट लावलेली आढळून आली. त्याच बरोबर कारला ब्लॅक फिलमिंग केलेले आहे. चालकाकडे वाहन चालवण्याचा परवानाही नव्हता. पोलिसांनी ही कार पोलीस ठाण्यात आणून कारला लावलेला लोगो जप्त केला. यासोबतच मोटार वाहन कायद्याप्रमाणे ६ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यामुळे सासवड शहरात “मला आमदार झाल्यासारखं वाटतंय” अशी उपरोधिक चर्चा रंगली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Shirur News : कवठे येमाई येथील बाजीराव उघडे;समाज रत्न” पुरस्काराने सन्मानित..!
Saswad News | कोडीत खुर्द येथील पाणीप्रश्न सुटला; गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे होणार पाणीपुरवठा
Farmer News | शेतकरी चिंतेत ! कडब्याच्या दरात वाढ, दुधाचा प्रतिलिटर निर्मिती खर्च वाढणार