Saswad Crime | पुणे : पोलिस निरीक्षकाकरिता तब्बल 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना अॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली आहे.
अक्षय सुभाष मारणे आणि गणेश बबनराव जगताप (रा .सासवड, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मारणे आणि जगताप हे दोघे राजकीय नेत्याचे कामे करतात.
पुणे जिल्ह्यातील सासवड येथील मोठ्या राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक…
जगताप पुणे जिल्ह्यातील सासवड येथील मोठ्या राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक (चुलत भाऊ) असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक क्रांती पवार,
पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, सहा पोलीस उपनिरीक्षक मुकुंद आयाचीत, पोलीस कॉन्स्टेबल तावरे,चालक पोलीस कॉन्स्टेबल पांडुंरग माळी यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण…
तक्रारदार यांनी सासवड पोलिस स्टेशन येथे तक्रारी अर्ज केला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्याकरीता सासवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक घोलप यांच्याकरीता अक्षय मारणे याने तीन लाख रूपये लाचेची मागणी केली. त्या लाच मागणीस गणेश जगताप याने सहाय्य केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला सासवड पोलिसांनी अवघ्या १८ तासात ठोकल्या बेड्या