Saswad Crime सासवड, (पुणे) : बांधकामाच्या सेंट्रींग लोखंडी प्लेट चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना सासवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
बाबासाहेब उर्फ बप्पा शामराव घोडके (वय ३९ वर्षे रा. शिवाई गार्डन, सुरक्षानगर, वैदवाडी, हडपसर), व अनिल ज्ञानोबा खंडागळे, (वय-३७, रा. वाडकरमळा, संकेतपार्क, महमदवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
शनिवारी (ता. २२) मध्यरात्री सोनोरी रोडच्या कडेला छत्रपती इंग्लिश स्कूलच्या पाठिमागे व्यंकटेश नंदनवन येथे नवीन बांधकाम साईट चालु आहे. हे बांधकाम साहित्य अज्ञात दोन चोरट्यांनी टेम्पोत भरून नेल्या प्रकरणी रोहन राजेंद्र जगपात (वय ३०, व्यवसाय बांधकाम ठेकेदार, सासवड, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली होती.
सदरच्या गुन्हा गंभीर असल्याने त्या अनुशंघाने गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले व साईत टेम्पोची माहिती घेतली. सदर तपास करीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली की, टेम्पो हा सुरक्षानगर, बैदवाडी, हडपसर येथे बप्पा घोडके हा वापरत आहे.
दरम्यान, त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात बेड्या ठोकल्या. तसेच तो वापरत असलेला टेम्पोही ताब्यात घेतला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी सासवड येथील बांधकाम साईटवरील सेंट्रींग प्लेटा चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
ही कामगिरी सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश पोटे, निलेश जाधव, सुहास लाटणे, जब्बार सय्यद, पोलीस मित्र शुभम घोडके यांचे पथकाने केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : खळबजनक! कोंढव्यात 62 वर्षीय ज्येष्ठाचा डोक्यात फरशी घालून खून