Sasvad News : लोणी काळभोर, (पुणे) : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी परराज्यातील एका २९ वर्षीय आरोपीला सासवड पोलिसांनी २४ तासाच्या आत हडपसर परिसरातून अटक केली आहे.(Sasvad News)
२९ वर्षीय आरोपीला सासवड पोलिसांनी अटक केली.
चंदु उर्फ चंदर यादव (वय- २९, रा. वाराणसी, उत्तरप्रदेश), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी दिली.(Sasvad News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासवड परिसरात राहतात. तसेच त्यांच्या शेजारी परराज्यातील चंदू राहत होता. यावेळी शेजारी राहणाऱ्या चंदूने मुलीस कषाचेतरी अमिश दाखवुन, फुस लावुन पळवुन नेलेबाबत रविवारी (ता. १६) सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.(Sasvad News)
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी तपासी अंमलदार व गुन्हे शोध पथकाला गुन्हयातील पिडीत मुलीचा शोध घेऊन आरोपीस अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस तपास करीत असताना आरोपीचे मोबईलचा तांत्रिक तपास केला व त्याचा सासवड, हडपसर, हांडेवाडी, मंतरवाडी फाटा, कात्रज पुणे असे वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला.(Sasvad News)
यावेळी आरोपी चंदू यादव हा या मुलीस उत्तर प्रदेश राज्यात पळुन घेवुन जाण्याच्या तयारीत असतांना आरोपी व पिडीत मुलीस हडपसर येथुन ताब्यात घेतले. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Sasvad News)
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के, सुप्रिया दुरंदे, गणेश पोटे, अभिजीत कांबळे, गोकुळ हिप्परकर, निलेश जाधव, सुरज नांगरे यांचे पथकाने केलेली आहे.