Sangli Crime | तासगाव, (सांगली) : द्राक्ष व्यापाऱ्याच्या स्कार्पिओ गाडीला चोरट्यांनी आपली गाडी आडवी लावत त्यांना व त्यांच्या सोबत असणाऱ्याला मारहाण करून गाडीतील सुमारे १ कोटी १० लाख रुपयांची रोकड ७ ते ८ चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. तासगावच्या दत्तमाळ येथील गणेश कॉलनी येथे मंगळवारी (ता. २८) दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
महेश केवलानी असे लुटलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून ते मूळचे नाशिकचे आहेत. व्यापारासाठी ते सांगलीत आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश केवलानी यांनी तासगाव तालुक्यातील काही द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी केली होती. त्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी ते सांगलीतून तासगावकडून स्कॉर्पिओ गाडीतून जात होते. एक कोटी १० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग त्यांच्यासोबत होती.
तासगावमधील गणेश कॉलनी येथे त्यांची गाडी आली असता ६ ते ७ जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवली व गाडीचालक, केवलानी तसेच त्यांच्या एका कामगाराला मारहाण करून गाडीतील एक कोटी १० लाख रुपये असलेले बॅग घेऊन पसार झाले.
दरम्यान, तासगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच तपासासाठी पथके रवाना केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
पाळत ठेवून हा कट रचल्याचा अंदाज…
जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. चोरट्यांनी द्राक्ष व्यापारी महेश केवलानी यांच्यावर पाळत ठेवून हा कट रचल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : टपाल खात्यातील आणखी एक घोटाळा उघड; लाखोंचा अपहार; डाक सहायकाविरुद्ध गुन्हा